जयपूर – भाजप आणि काॅंग्रेसच्या जिल्हा स्तरावरील महिला पदाधिकारी एकत्रित वेश्या व्यवसाय चालवत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. सेक्स रॅकेटची म्होरकी असणारी काॅंग्रेस महिला नेता पूनम उर्फ पूजा चौधरी ही 20 दिवसांपासून फरार होती. पोलीसांनी तिला आज ताब्यात घेतले आहे. पूनमविरोधात अल्पवयीन मुलीचा देहव्यापार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजप महिला मोर्चाची सुनीता वर्मा आणि
काॅग्रेसप्रणीत सेवा दलाची पूनम चौधरी ह्या दोघी राजस्थानमधील सवाईमाधोपूर येथे एकत्रित वेश्या व्यवसाय चालवत होत्या. सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर सुनीता वर्माला अटक करण्यात आली होती. तर काॅंग्रेसची नेता पूजा फरार झाली होती. आज अखेर पोलीसांनी तिला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण सेक्स रॅकेट प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत एकून 8 जणांना अटक केली आहे.
या आठ जणांमध्ये सुनीताचा सोबती हिरालाल, जिल्हा उद्योग केंद्राचा लिपिक संदीप शर्मा, कलेक्टर कार्यालयाचा शिपाई श्योराम मीना तसेच इलेक्ट्रिशीयन राजूलाल रॅगर यांचा समावेश आहे.
एका अल्पवयीन मुलीने तक्रार दिल्यानंतर या दोन पक्षाच्या महिला एकत्रित सेक्स रॅकेट चालवत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी ही इयत्ता आठवीमध्ये शिकत असून तिचं ऑक्टोंबर 2019 ते मे 2020 दरम्यान लैगिक शोषण करण्यात आल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं आहे.