पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्र येथे क्लोरीन वायुगळती नियंत्रण या विषयावरील आपत्कालीन सरावाचे आयोजन करण्यात आले होते. या आपत्कालीन सरावामध्ये एनडीआरएफ दलाचे ५१ जवान, महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाचे २९ जवान, पोलीस दलाचे २२ जवान, दंगल नियंत्रण पथकाचे २० जवान, सुरक्षा विभागाचे ११ सुरक्षारक्षक तसेच वैद्यकीय विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. या सरावावेळी महापालिका, एनडीआरएफ, पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्यगिक सुरक्षा संचलनालय यांचा सहभाग होता.
या मॉक ड्रीलवेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) प्रदीप जांभळे पाटील, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, उपआयुक्त मनोज लोणकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, चीफ केमिस्ट प्रशांत जगताप, कार्यकारी अभियंता डॉ. रवी तुपसाखरे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम उपस्थित होते.
तसेच एनडीआरएफचे सेकंड इन कमांडंट रविप्रकाश, दीपक तिवारी, सहाय्यक कमांडंट प्रवीण धट, पोलीस निरीक्षक अजयकुमार यादव, ईश्वरदास मते, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल टारपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. डी. चौधरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुनंदा जाधव, औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहाय्यक संचालक संजय गिरी, पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, दंगल नियंत्रण पथकाचे प्रमुख संदीप देशमुख, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे, गौतम इंगवले तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज निगडी येथील सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्र येथे क्लोरीन वायुगळती नियंत्रण या विषयावरील आपत्कालीन सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
अधिक माहितीसाठी-
● Play Store: https://t.co/X0LN5kiSYH
● IOS: https://t.co/w2RkHpULPy#PCMCSmartSarathi pic.twitter.com/btZb9ovRMn— PCMC Smart Sarathi (@PCMCSarathi) January 11, 2024
महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये क्लोरीनचा वापर जलशुद्धीकरणासाठी केला जातो. याकरिता याठिकाणी क्लोरीनचे सिलिंडर ठेवलेले असतात. कोणत्याही ठिकाणी रासायनिक विषारी वायुगळती झाल्यास ती दुर्घटना कशा पद्धतीने हाताळावी यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने सेक्टर क्र. २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात आपत्कालीन सराव घेण्यात आला. एनडीआरएफचे पोलीस निरीक्षक अजयकुमार यादव यांनी विषारी वायुगळती रोखण्याबद्दल माहिती दिली.