पॅरिस – नेमार व किलियन एम्बापे या स्टार खेळाडूंनी केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाने लीग-1 फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात क्लेर्मोन्टचा 6-1 असा दणदणीत पराभव केला.
या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या पासवर नेमारने 6 व्या, तर एम्बापेने 19 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, क्लेर्मोन्टच्या जोडेल दोसूने 42 व्या मिनिटाला गोल करत ही आघाडी कमी केली. दुसरा हाफ सुरू झाल्यावर मात्र, नेमारने 71 व 83 व्या व एम्बापेने 74 आणि 80 व्या मिनिटांना गोल करत हॅट्ट्रिक साकार करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.