मेस्सी ‘पीएसजी’कडून खेळणार

पॅरिस – बार्सिलोनाशी करार मोडल्यानंतर स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसी आता पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाकडून खेळण्याची शक्‍यता आहे. मात्र, अद्याप क्‍लब तसेच मेस्सीने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

पीएसजी संघात मुळातच अनेक स्टार खेळाडू असताना क्‍लब मेस्सीसारख्या अत्यंत महागड्या खेळाडूशी करार करणार का हा देखील एक प्रश्‍न आहे. मेस्सीने दोन दिवसांपूर्वीच बार्सिलोनासोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर पीएसजीकडून खेळण्याचे संकेत दिले होते. पीएसजीने मेस्सीशी संपर्कही साधला होता.

हा करार दोन वर्षांचा असेल अशी शक्‍यता असून बार्सिलोनाकडून मिळत होती तीच रक्कम पीएसजी देणार का हा देखील मेस्सीसमोरचा प्रश्‍न राहणार आहे. पीएसजी संघात ब्राझीलचा नेमार, फ्रान्सचा किलियान एम्बापे, अर्जेटिनाचा एंजल डी मारिया यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे.

त्याशिवाय काही महिन्यांपूर्वीच त्यांनी स्पेनचा सर्जिओ रामोस आणि युरो चषक विजेत्या इटलीचा गोलरक्षक डोनारुमा यांनाही करारबद्ध केले असून आता मेस्सीने करार केला तर हा क्‍लब सर्वात बलाढ्य होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.