पुणे – इयत्ता अकरावीच्या तिसऱ्या नियमित प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर होणार आहे.
अकरावीसाठी 304 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 7 हजार 30 प्रवेशाच्या जागा आहेत.
आतापर्यंत 1 लाख 1 हजार 362 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. यातील 85 हजार 8 जणांचे अर्ज लॉक झाले असून त्यातील 84 हजार 710 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली.
77 हजार 222 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांची पसंती नोंदवली. पहिली व दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीत मिळून एकूण 41 हजार 38 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. 65 हजार 992 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत.
तिसऱ्या फेरीला 10 डिसेंबरपासून सुरुवात झाली. पात्र, विद्यार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी (दि.15) सकाळी 11 वा. गुणवत्ता यादी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर लगेचच या फेरीतील उर्वरित प्रवेश प्रक्रिया 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.