मुंबई- ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील वहिनीसाहेब म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी एका चिमुरड्याने आगमन झाले आहे. धनश्रीने ही गोड बातमी सोशलच्या माध्यमातून आपल्या फॅन्स सोबत शेअर केली आहे.
View this post on Instagram
धनश्री आणि तिचा चिमुकला दोघे ही अगदी सुखरुप असल्याचे सांगितलं आहे.. धनश्रीनं पोस्टमध्ये सर्वांनी दिलेल्या आशीर्वादाचे आभार मानलेत… धनश्रीवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
धनश्री सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्स सोबत शेअर करत असते. धनश्रीने आपल्या डोहाळे जेवणाचे अप्रतिम फोटो सुद्धा चाहत्यांशी शेअर केले होते.
View this post on Instagram