चिंबळी- करोनाच्या पार्श्वभूमीवर चिंबळी येथे बुधवारी (दि. 15) व शुक्रवार (दि. 17) कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बुधवारी व गुरुवारी यास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून गावात शुकशुकाट जाणवत आहे. या बंद दरम्यान, केवळ मेडिकल व दवाखानेच सुरू ठेवण्यात आले आहेत. तर गावात येणाऱ्या अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांची तपासणी करून त्या निर्जंतुक करूनच गावात सोडल्या जात आहेत.