यूपीत फक्त ‘जंगलराज’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला खोचक टोला

मुंबई –  उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ गेल्या काही महिन्यात इतर राज्याच्या लोकांना  मार्गदर्शन करत होते  मात्र आज  योगी सरकारच्या  यूपीत फक्त  जंगलराज आहे. सर्व प्रथम त्यांनी आपल्या राज्यात  लक्ष घालावं, असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे.


ते पुढे म्हणाले, या घटनेत  पीडित मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची जीभ कापण्यात आली , तसंच तिच्या पाठीचा कणा देखील त्यांनी मोडला. 10 दिवस तिचे कुटुंबीय एफआयआर देण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांचा एफआयआर देखील घेतला गेला नाही, असं अनिल देशमुख म्हणालेत.

दरम्यान ,  उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा( बुधवारी दि . ३० सप्टेंबर ) दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  या घटनेमुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त होऊ लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.