राज्यातील शिंदे सरकारमधील मंत्र्यांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरु झाला आहे. शिंदे गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका करतांना म्हणाले,’सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत असतील, मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा’ अशी खोचक टीका गायकवाड यांनी केली. यावर आता अजित पवार गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिली जात आहे.
संजय गायकवाड यांच्या टीकेवर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया दिली आहे. रुपाली पाटील म्हणाल्या,’संजय गायकवाड यांना अशी वक्तव्य करायला रोखलं पाहिजे. अन्यथा त्यांचे पाय उखडून टाकायला कार्यकर्ते खंबीर आहे. छगन भुजबळ हे कशाला पाहिजे? तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल.
त्या पुढे म्हणाल्या,’तू आमदार तुझ्या घरी, बोलताना नीट बोललं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे. अन्यथा सत्तेतील कुस्ती लोकांना पाहायला मिळेल”, असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला. जर संजय गायकवाड यांनी शिव्या दिल्या तर डबल शिव्या द्या’ असा सल्ला रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.’ असेही ते म्हणाले आहे.