हिंगोली – “मला म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत. माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी आंदोलनं मी केली आहेत. असं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर सभेतून ठणकावून सांगितलं. हिंगोली येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार सभेत (Obc algar sabha) भुजबळ बोलत होता. यावेळी त्यांनी मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती (स्टे) देण्याची देखील मागणी केली. (stay to Kunbi certificates of Marathas)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापले आहे. जरांगे पाटील (Jarange Patil) विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष आरक्षणाच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. अशात आता भुजबळ यांनी हिंगोली सभेतून सरकारकडे जाहीर मागणी केली आहे. (maratha obc reservation)
बीडमधील घरे जळाली. त्याचा कुणी धिक्कार केला नाही. तिथे सर्वांनी जायला हवे होते. धीर द्यायला हवा होता. निषेध करायला हवा होता. पण, कुणी गेला नाही. मी गेलो तर म्हणे आग लावयला गेला.म्हणजे अश्रू पुसायलाही जायचे नाही का ? अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal vs jarange patil) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले भुजबळ नेमकं यावेळी
मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राज्य सरकारने शिंदे समिती स्थापन केली आहे. ही समिती बरखास्त करा, तसेच दोन महिन्यात जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत,त्यानां स्थगिती (स्टे) द्या अशी मागणी भुजबळांनी यावेळी केली. तसेच सर्वांची जनगणना करा.सर्वांचा सर्व्हे करा आणि मगच मागासलेपण ठरवा असंही भुजबळ यावेळी म्हणाले. (Dismiss Shinde Committee)