पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर बदल करण्यात आला आहे.
नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या व जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन लेनमध्ये, तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन लेनमध्ये वाहतूक करावी. असे महाराष्ट्र cने कळवले आहे.
या वाहतुकीच्या बदलामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी ९८२२४-९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४-९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.