पुणे -सध्याच्या लग्नसराईच्या काळात तुम्ही जर काही स्पेशल, इतरांपेक्षा वेगळे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि तर्फे ‘ वेडिंग मोमेंट्स – यू अँड आय’ हे कॅम्पेन तुमच्यासाठीच सुरु होत आहे. या अंतर्गत विवाहप्रसंगी खास ठरणारे हिऱ्यांचे नावीन्यपूर्ण अलंकार हे या वेडिंग मोमेंट्सचे खास आकर्षण आहे.
पारंपरिक दागिन्यांपेक्षा वेगळ्या, डायमंड डिझाईनच्या एक्सक्लूझिव्ह व्हरायटीज तुम्हाला इथे पाहता व खरेदी येणार आहेत. तसेच हिऱ्यांच्या बांगड्यांच्या विविध व्हरायटीज् देखील इतक्या सुंदर आहेत की विवाह प्रसंगी तुम्ही लक्षवेधी ठराल. यासोबतच सोन्यातले कुंदनचे अनेक आकर्षक दागिनेही उपलब्ध आहेत. सर्वोत्कृष्ट कारागिरीमुळे या दागिन्यांमध्ये असणारा शाही रुबाब आणि त्यामुळे येणारे सौंदर्याचे तेजोवलय लग्नसमारंभात वधूचे सौंदर्य वाढविणारे आहे.
कुंदनचे दागिने गुढीपाडव्यासारख्या पारंपारिक सणांमध्ये उठावदार ठरतात. या दागिन्यांची अनेक मनमोहक डिझाईन्स शोरुममध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. या विवाह दागिन्यांच्या निमित्ताने चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि यांनी दि. 17 ते 22 मार्च या कालावधीत ‘सोने खरेदीवर सोने मोफत’ ही ऑफरही दिलेली आहे. सदरची ऑफर चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स्च्या महाराष्ट्र व कर्नाटक मधील सर्व शोरुम्स्मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच तुमच्या घरात लग्नकार्य ठरले असेल किंवा गुढीपाडव्यासाठी तुम्ही खास दागिने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स्च्या शोरूमला आवर्जून भेट द्या.