कर्नाटक – भारत चंद्रावर इतिहास घडवण्याच्या अत्यंत समीप पोहोचला आहे. चंद्रयान -2 चे लॅंडिंग मॉड्यूल ‘विक्रम’ शनिवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर ऐतिहासिक सुखरूप लॅंडिंग करण्याचा अंतिम टप्प्यात आहे. भारताची ही दुसरी चंद्र मिशन चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुव क्षेत्रावर प्रकाश टाकेल जिथे आजपर्यंत कोणत्याही देशाने पाय ठेवला नाही. त्यामुळे हा भारातासाठी एक ऐतिहासिक दिवस असणार आहे.
दरम्यान, हा ऐतिहासिक क्षणासाठी पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बंगळूरमध्ये दाखल झाले आहेत. बंगळूर विमानतळावर दाखल होताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 70 विद्यार्थ्यांसह इस्रोच्या बंगळुरू केंद्रातून हा ऐतिहासिक क्षण पाहणार आहे.
Karnataka: Prime Minister Narendra Modi arrives at Bengaluru Airport; received by CM BS Yeddiyurappa. He will reach ISRO centre in Bengaluru tonight ahead of landing of #Chandrayaan2 on the moon. pic.twitter.com/Bc9RngfjPl
— ANI (@ANI) September 6, 2019