चंद्रपूर – महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात काही लोकांनी केलेल्या गोळीबारात स्थानिक भाजप कार्यकर्त्याची पत्नी ठार झाली आणि एक जण जखमी झाला. या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे, असे राजुरा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
हल्लेखोर जुन्या वैमनस्यातून सोमनाथपूर वॉर्डातील रहिवासी लल्ली शेरगिल याला ठार मारण्यासाठी आले होते. ही बाब शेरगिल यांच्या लक्षात येताच त्यांनी भाजपच्या युवा शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे याच्या घरात प्रवेश केला. शेरगिलच्या मागे धावत आलेल्या हल्लेखोरांनी तेथेच अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
त्यावेळी सचिन डोहे यांची पत्नी पूर्वा डोहे घराच्या अंगणात आली, त्यावेळी तिच्या छातीत गोळी लागली आणि ती जागीच कोसळली, तर शेरगिलला पाठीत गोळी लागली. दोघांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले जेथे पूर्वा डोहे यांना मृत घोषित करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या शेरगिलला उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.