वाल्हे, (वार्ताहर)- पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्षपदी अंबाजीचीवाडी येथील हेमंत सत्यवान सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे पुरंदर तालुका संपर्क दौर्यावर आले होते. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व जय पवार यांच्या हास्ते हेमंत सूर्यवंशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष उत्तमराव धुमाळ, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, युवक अध्यक्ष अमित झेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, दत्तात्रेय झुरूंगे, गणेश जगताप, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप, महिला अध्यक्षा वंदना जगताप, गुळूंचे उपसरपंच दीपक निगडे, राजेश चव्हाण, राजेंद्र धुमाळ, लक्ष्मण गोफणे, वाल्हे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडी सरपंच सुनील पवार, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, उपसरपंच अमित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
हेमंत सूर्यवंशी यांची युवक उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, अमोल खवले, माजी उपसरपंच सूर्यकांत पवार, पोपट पवार, सूर्यकांत भुजबळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष जयवंत भुजबळ, समदास भुजबळ, सत्यवान सूर्यवंशी, नारायण पवार आदींसह अनेकांनी अभिनंदन केले. दरम्यान, युवकांचे संघटक करून पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे हेमंत सुर्यवंशी यांनी सांगितले.