देहूरोड, (वार्ताहर) – सदन कमांड प्रमुख आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह यांच्या वतीने सदन कमांडमध्ये कार्यरत २९ युनिटस व लष्करातील जवानांना शौर्य पदक देऊन गौरविण्यात आले. या २९ युनिटसमध्ये देहूरोड येथील केंद्रीय आयुध भंडार डेपोला ८२ वर्षांत प्रथमच प्रसंशा युनीट या पुरस्काराने डेपोतील कमांडट ब्रिगेडियर मनोजकुमार शर्मा यांना गौरविण्यात आले.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भक्ती शक्ती स्मारकास डेपोतील कमांडट ब्रिगेडियर मनोज कुमार शर्मा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. ब्रिगेडियर शर्मा यांनी डेपोला पुरस्कार मिळून दिल्याबद्दल सर्व कामगारांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात डेपोतील प्रशासकीय अधिकारी कर्नल मनोज सक्सेना, लष्करी अधिकारी, सैनिक व डेपोतील कामगार उपस्थित होते.
डेपोतील सर्व युनियनच्या वतीने ब्रिगेडियर शर्मा यांना फेटा बांधून, शाल, पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला. देहूरोड केंद्रीय आयुध भंडार (सीओडी डेपो) येथे डेपोला पुरस्कृत केल्याने लष्करी परीसरात मिरवणूक काढण्यात आली. सीओडी वर्क्स कमिटीचे सेक्रेटरी संजय दुमडे यांनी माहिती दिली.