पुणे – कास्टिंग डायरेक्टरवर एका नवोदित अभिनेत्रीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत अभिनेत्री अल्पवयीन असल्यापासून तीच्यावर अत्याचार करण्यात आले आहे. अमित प्रेमचंद सिटलानी (40,रा.मधुबन सोसायटी, कळस) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एका 21 वर्षीय ज्युनियर महिला कलाकाराने मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर विश्रांतवाडी पोलीसांनी कास्टिंग डायरेक्टरविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. कात्रज येथील रहिवासी असलेल्या महिला कलाकाराने तक्रारीत म्हटले की, कास्टिंग डायरेक्टरला ती 2017 पासून ओळखते. दोघे त्यांच्या व्यवसायामुळे एकमेकांना भेटले. पिडीतेला अभिनेत्री व्हायचे होते. तिने सुरवातीला चित्रपटांमध्ये बॅकस्टेज कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांनी सांगितले की, “नवोदित कलाकारांच्या मुलाखती घेणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरने प्रथम पिडीतेचा विश्वास जिंकला. त्यानंतर मे 2017 मध्ये तिला विश्रांतवाडीतील टिंगरेनगर येथे एका फ्लॅटवर नेले. तेथे पार्टी आयोजीत करण्यात आली होती. त्यानंतर तीच्यावर बलात्कार केला. हा फ्लॅट कास्टिंग डायरेक्टरच्या मित्राचा आहे. तिच्यावर बलात्कार करताना कास्टिंग डायरेक्टरने तिचा व्हिडीओ शूट केला. नंतर तो व्हिडिओ अपलोड करून व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण केले.
पिडीतेने बॅकस्टेज कलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काही छोट्या भूमिका केल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत कास्टिंग डायरेक्टर विमाननगर आणि खराडी येथील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून धमक्या देऊन तिचे शोषण करत होता. दोन वेगवेगळ्या प्रसंगी, अभिनेत्रीने हॉटेलच्या खोल्यांमध्ये तीने त्याला विरोध केला. परंतु कास्टिंग डायरेक्टरने तिला थप्पड मारली आणि लाथ मारली. नवोदित अभिनेत्रीचे तिचे लैंगिक शोषण झाले तेव्हा ती अल्पवयीन होती.