राजगुरूनगर -चांडोली (ता. खेड) येथे रात्रीच्या वेळेस कारमधील मोबाइल चोरणाऱ्या एका भामट्यास व मोबाईल विकत घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.
दीपक गोरोबा नाईकनवरे (रा. शिरोली फाटा) व अनिकेत प्रदीप बगाटे (वय 26 रा. चांडोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश चप्पलवार यांनी फिर्याद दिली.
आज (बुधवारी) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत दीपक नाईकनवरे हा चोरीचा मोबाइल वापरत असून तो त्याच्या एका मित्रासोबत चांडोली फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दीपकला ताब्यात घेतले. त्याने हा मोबाइल अनिकेत बगाटे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार अनिकेतला ताब्यात घेतले.