पुणे -हापूस आंब्याचा हंगाम जोर धरत असताना, पुण्यातील एका व्यापाऱ्याने ‘ईएमआय’वर आंब्यांची विक्री सुरू केली आहे. नागरिकांच्या खिशाला झळ न पोहचता त्यांना हापूसची चव चाखता यावी म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत समान महिन्याच्या हप्त्यावर (ईएमआय) फळ ऑफर केले जात आहे, जेणे करून लोकांच्या खिशाला झळ न बसता हापूस आंब्याची चव चाखता येईल.
गौरव सणस यांनी दावा केला, की त्यांच्या कुटुंबाचे “ईएमआय’वर आंबे विकणारे देशातील पहिले दुकान आहे. पुण्यातील गुरुकृपा ट्रेडर्स अँड फ्रूट प्रॉडक्ट्सचे फळ विक्रेते, गौरव सणस यांनी ही अनोखी योजना सुरू केली. त्यांनी सांगितले, की कोविडनंतर असे दिसून आले की लोक हापूसच्या उच्च किमतीमुळे त्याची चव गमावत आहेत. त्यामुळे आम्ही ग्राहकांना परत आणण्यासाठी “ईएमआय’वर आंबा देण्याची ही योजना सुरू केली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच भाव चढे असतात. त्यामुळे सर्वांना फळे परवडतील, यासाठी ही योजना राबवण्यात आली. आम्ही विचार केला की जर रेफ्रिजरेटर, एसी आणि इतर उपकरणे “ईएमआय’वर खरेदी करता येतात, तर आंबे का नाही? या योजनेमुुळे प्रत्येकाला आंबाही परवडेल.
अशी आहे योजना
जो कोणी आंबा त्याच्या आउटलेटवरून “ईएमआय’ने खरेदी करू इच्छितो, त्याने क्रेडिट कार्ड वापरणे आवश्यक आहे.
खरेदीची रक्कम तीन, सहा किंवा 12 महिन्यांच्या “ईएमआय’मध्ये रूपांतरित केली जाईल.
ही योजना फक्त त्यांच्यासाठी पात्र आहे,
जे किमान 5,000 रुपयांची खरेदी करतील.
हापूस आंब्याची किंमत इतर जातींच्या तुलनेत लक्षणीय आहे. किरकोळ बाजारात ते सध्या 800 ते 1300 रुपये प्रति डझन या दराने विकले जात आहेत.
– गौरव सणस, फळ व्यापारी