श्रीनगर : जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेच्या पाच सदस्यांना अटक करून प्रजासत्ताक दिनावर हल्ला करण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. मोठ्या प्रमाणात दारू गोळा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तळावर बॉम्बहल्ला करण्याचा मनसुबा होता. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. या घटनेमुळे जैशचे एक जाळेही उद्ध्वस्त झाले आहे. त्यांनी हजरतबाल येथे दोन बॉम्नस्फोट घडवल्याचा आरोप आहे.
अटक केलेल्यांमध्ये एजाझ अहमद शेख (रा. सदरबाल हझरतबाल), उमर हमीद शेख (रा. असार कॉलनी, हजरतबाल), इप्तियाज अहमद चिक्ला (रा. आसार कॉलनी, हजरतबाल), सलील फारूक गोजिरी (रा. इल्लाहीबाग) आणि नासीर अहमद मीर (रा. सदरबाल हजरतबाल) यांचा समावेश आहे.