बर्लिन : टेनिसविश्वातील आघाडीचा टेनिसपटू रफाएल नदाल, नाओमी ओसाका, अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गाॅफ आणि फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सी यांना वेगवेगळ्या गटात लाॅरेन्स पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. १७ फेब्रुवारी २०२० ला बर्लिनमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
The great Laureus ceremony is coming, which brings together the best athletes of all time, this year on February 17th in Berlin.
As an Academy member I have to vote for the best sportsman of the year.
Who is your favorite? pic.twitter.com/q9MXP7rSD6— Carles Puyol (@Carles5puyol) January 15, 2020
वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठी रफाएल नदाल याला फाॅर्मूला वन विश्व चॅम्पियन लुईस हॅमिल्टन, विश्व मोटोजीपी चॅम्पियन मार्क मार्कझ ,धावपटू एलिड किपचोग आणि सहावेळा फीफाचा वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबाॅलपटू पुरस्कार जिंकणा-या लिओनेल मेस्सी यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे.
🏆 #Laureus20 Sportswoman of the Year 🏆
These six ladies all had an incredible 2019 and continue to inspire people around the world…
Good luck to them all 🙌
#SportUnitesUs pic.twitter.com/HugemrYFhz— Laureus (@LaureusSport) January 15, 2020
महिलांच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठी टेनिसपटू नाओमी ओसाका, फुटबाॅलपटू मेगन रापिनो, जिम्नॅस्टिक खेळाडू सिमन बिल्स, धावपटू अॅलिसन फेलिक्स, धावपटू शेली अॅन फ्रेसर-प्राइस, अमेरिकेची स्की खेळाडू मिकाएला शिफ्रिन यांच्यात स्पर्धा आहे.