पुणे : दि पुणे लॉयर्स कंझ्युमर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. पुणेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांच्या हस्ते झाले.
सोसायटीचा हा चांगला उपक्रम असल्याचे धोटे यांनी सांगितले. तर, मोठी उलाढाल असलेली राजातील ही एकमेव वकिलांची सोसायटी असल्याचे ऍड. ढोरे यांनी यावेळी नमुद केले.
त्यावेळी सत्र न्यायाधीश एस.एस.गोसावी, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत आगस्ते, सोसायटीचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग ढोरेपाटील, उपाध्यक्ष ऍड. प्रकाश कामठे, सचिव ऍड. दादाभाऊ शेटे, सहसचिव ऍड. शिल्पा टापरे, माजी अध्यक्ष आणि संचालक ऍड. यशवंत खराडे, ऍड. पंडित धुमाळ, ऍड. प्रकाश मासाळ, ऍड. संदीप सावंत, संचालक ऍड. रमेश कोकरे, ऍड. फैय्याज शेख, ऍड. निवेदीता काळे, ऍड. विजय आढाव, ऍड. नंदकिशोर तिखे, राहुलकुमार गुंदेचा, ऍड. राणी कांबळे, ऍड. सुनील जगताप, स्विकृत तज्ज्ञ संचालक ऍड. मनोहर पवार आणि ऍड. नरेंद्र जाधव उपस्थित होते.