पिंपरी, दि. 25 – चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान होत आहे. त्यासाठी पीएमपीएमएलतर्फे 102 बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही मार्गावरील बस कमी होणार असून प्रवाशांनी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन पीएमपीतर्फे करण्यात आले आहे.
चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी (दि. 24) थांबली. रविवारी (दि. 26) मतदान तर, गुरुवारी (दि.2) मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी पीएमपीतर्फे बसची सुविधा पुरविण्यात आली आहे. निगडी आगारातून 35 बस देण्यात आलेल्या आहेत. तर, सर्व मिळून 102 बस देण्यात आलेल्या आहेत. दुपारपाळीमध्ये पीएमपीएमएलतर्फे बसेस देण्यात आल्यामुळे सदर बसेस संचलनात कमी राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी परिवहन महामंडळास सहकार्य करावे व मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोट
निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी पीएमपीतर्फे बस देण्यात आलेल्या आहेत. निगडी आगारातून 35 बस व इतर मिळून 102 बस देण्यात आलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही सुविधा पुरविण्यात आलेली आहे. रविवारी (दि. 26) मतदान होत असून मतदान केंद्र ते थेरगाव येथील केंद्रापर्यंत ही सेवा असणार आहे.
– शांताराम वाघेरे, निगडी आगार व्यवस्थापक.