Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर आदळल्याने बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर चालकासह आठ जणांचे प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 1, 2023
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले,’समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर आदळल्याने बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर चालकासह आठ जणांचे प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’
अशात पोलिसांसमोर अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान आहे. ओळख पटवीण्यासाठी डीएनए टेस्ट शिवाय पर्याय नसल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिस मधून मृतांची नावं मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्न करत आहे आहे.