डेहराडून – पत्रकार बातम्या कुठून मिळवतात किंवा बातम्या असतात कुठे, याचे साधे उत्तर असे दिले जाते की, तुम्ही तुमच्या घरापासून ऑफिस, शाळा अथवा कामाच्या ठिकाणी जाण्यादरम्यानच्या अंतरात दररोज तुम्हाला तीन ते चार बातम्या मिळू शकतात. गरज असते ती फक्त पत्रकाराच्या चाणाक्ष नजरेची. उत्तराखंदमध्ये अवघ्या 15 वर्षांच्या युवतीने याच तत्त्वाचा आधार घेत, तिच्या घरापासून शाळेपर्यंत जाणाऱ्या आणि नव्याने केलेल्या पण अल्पावधीत उखडलेल्या रस्त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत पोस्ट करुन उत्तराखंड प्रशासनाला, त्या रस्त्याचे काम पुन्हा सुरु करावे लागले. याबद्दल सुहानीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील देवारखदोडा येथील रहिवासी असलेले धीरज बिश्त यांची सुहानी ही 15 वर्षीय कन्या. आपले पत्रकारितेचे शिक्षन घेत असताना ती सतत चौअकस नजरेने भवतालाकडे पहायची आणि उद्विग्न व्हायची. तिच्या गावातला गोपेश्वर ते घिग्वन गावांदरम्यानचा एक रस्ता जिल्हा प्रशासनाने अवघ्या काही महिन्यांपूर्वीच “दुरुस्त’ केला होता. मात्र, हा रस्ता “दुरुस्त’ होऊन सहा महिने व्हायच्या आतच त्यावर असंख्य खड्डे पडले आणि डांबरही वाहून गेले.
हे पाहिल्यानंतर सुहानी अस्वस्थ झाली आणि तिने मोबाईल कॅमेऱ्यावर आपल्या वडीलांना या रस्त्याबाबतचा एक व्हिडीओ शूट करायला सांगितले. एखाद्या टेलिव्हिजन रिपोर्टरच्या आविर्भावात सुहानीने हा व्हिडीओअ शूट केला. त्यामध्ये रस्ता वापरणाऱ्या नागरिकांचे काही बाईट्सही घेतले आणि तिने हा व्हिडीओ समाजमाध्यमांत पोस्ट केला. त्यानंतर सर्वत्र हा व्हिडीओअ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि तो उत्तराखंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अवघ्या 12 तासांत जिल्हा प्रशासनाने सदर रस्ता विद्युअतवेगाने दुरुस्त करुन दिला असून, आता किमान तीन ते चार वर्षे रस्ता टिकेल, अशी हमीही दिली आहे.
एका उगवत्या पत्रकार युवतीने अशा प्रकारे आदर्श पत्रकारितेचे उदाहरण घालून दिल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निमित्ताने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांमधला भ्रष्टाचार आणि कमिशनखोरी उघडकीस आल्याचे मानले जात आहे. आदर्श पत्रकारिता यापेक्षा वेगळी असू शकते का?