नवी दिल्ली – माध्यम म्हणून चित्रपट, व्यापक कक्षेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो आणि सामान्य लोकांमध्ये किंवा दर्शकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. देशभरात सगळीकडे साथीच्या आजाराशी लढा सुरू असताना सिनेमागृह आणि चित्रपटगृह बंद असले, तरीही नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्रपट विभाग अर्थात फिल्म्स डिव्हिजन, माहितीपटांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.
‘लिव्हिंग द नॅचरल वे’मध्ये ब्रह्मपुत्रातील एका छोट्या बेटावर राहणाऱ्या मिशिंग जमातीची, तसेच तेथील बदलते हवामान व पर्यावरण आणि त्यांच्या पारंपरिक राहणीमानाला दिल्या गेलेल्या आव्हानाची एक कथा आहे. ‘व्हॅनिशिंग ग्लेशिअर’ हा माहितीपट, जागतिक तापमानवाढीमुळे आणि हिवाळ्यातील वातावरणावरील परिणामामुळे असामान्यपणे वितळणाऱ्या हिमनगाबाबतची चिंता मांडतो.
हे चित्रपट ऑनलाइन पाहण्यासाठी www.filmsdivision.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. ‘डॉक्युमेंटरी ऑफ द विक’ या विभागात हे चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. फिल्म्स डिव्हिजनच्या यू ट्यूब चॅनेलवर पाहता येऊ शकता येईल.