Ajit Pawar : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी ५ जानेवारी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद मोहोळ गेल्यावर अवघ्या आठ तासांमध्ये पोलिसांनी या गुन्ह्यातील आठ आरोपींना गजाआड केलं.
शरद मोहोळची ज्या कोथरुडमध्ये दहशत होती तिथेच भर दिवसा गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. कोथरुडच्या सुतारदरा भागातील याच ठिकाणी शरद मोहोळवर गोळीबार झाला. दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मोहोळवर चार गोळ्या झाडल्या, यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. त्याला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुढे ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषीत करण्यात आलं.
दरम्यान, या घटनेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की,
“पुण्यात काल एक घटना घडली होती. पण पोलिसांनी ताबोडतोब जे कुणी दोषी होते त्यापैकी अनेकांना पकडलं आहे. पोलिसांनी दोन-तीन तासांपूर्वी पत्रकार परिषद देखील घेतली आणि सर्व वस्तूस्थिती सांगितली. पोलिसांचा पुढचा तपास सुरु आहे. असं अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, ‘या प्रकरणाचा तपास झाल्याशिवाय, संपूर्ण कागदपत्र पुढे आल्याशिवाय मील त्याबद्दल बोलणं उचित नाही, मी एवढंच तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या संदर्भात जी काही वस्तूस्थिती आहे ती लोकांसमोर आणली जाईल. तशा पद्धतीने एफआयआर दाखल केली जाईल. अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.