नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) सहा कार्यालये उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला तामिळनाडूतून अटक करण्यात आली आहे. यूपी एटीएसच्या माहितीवरून तामिळनाडू पोलिसांनी राज मोहम्मदला पुडुकोडी जिल्ह्यातून अटक केली आहे. राज मोहम्मदने यूपीमधील 2 ठिकाणांसह 6 ठिकाणी आरएसएसची कार्यालये उडवून देण्याची धमकी दिली होती.
(Rss) च्या 6 कार्यालयांना बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लखनऊमधील मादियानव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यूपी एटीएसने तामिळनाडू पोलिसांना राज मोहम्मदची माहिती दिली होती. यानंतर तामिळनाडू पोलिसांनी ही कारवाई केली.
तीन भाषांमध्ये दिल्या होत्या धमक्या
सोमवारी रात्री ८ च्या सुमारास एका व्हॉट्सअॅप ग्रुपला लखनऊ आणि आरएसएसची इतर पाच कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. यामध्ये उत्तर प्रदेशातील दोन आणि कर्नाटकातील चार कार्यालयांचा समावेश आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये धमक्या देण्यात आल्या. यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषांचा वापर करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अल अन्सारी इमाम राझी उन मेहंदी नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवला जात होता. यामध्ये ग्रुपमध्ये तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये काही गोष्टी शेअर केल्या होत्या. ज्यात कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये धमक्या लिहिल्या होत्या. इंग्रजी भाषेत लिहिले आहे की.’ V49 R+J8G Nawabganj uttarpradesh 271304:Your six party office is bombed at 8 pm stop the explosion if u can ‘ तसेच व्हाट्स अँप वर एक लिंक देण्यात आली होती. या लिंकद्वारे RSS चे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.