ब्राझीलचे शिक्षणमंत्री डिकोटेली यांचा राजीनामा

पॅराग्वे – ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी काही दिवसांपूर्वीच नियुक्ती केलेल्या देशाच्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. एकीकडे बोल्सोनारो यांना जनतेचा पाठिंबा मिळत नसतानाच

शिक्षणमंत्र्यांनाच नियुक्तीनंतर काही दिवसात राजीनामा द्यावा लागल्याने बोल्सोनारो आणखीन अडचणीत सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षणमंत्र्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात शंका उपस्थित केल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

बोल्सोनारो यांनी शिक्षण मंत्रिपदी नियुक्त केलेल्या कार्लोस ऍलबर्टो डिकोटेली हे आर्थिक विषयांचे तज्ज्ञ आहेत. मात्र, कार्लोस यांनी आपल्या शिक्षणासंदर्भातील खोटी माहिती दिल्याचे आरोप त्यांच्या नियुक्तीनंतर करण्यात आले. त्यानंतर कार्लोस यांनी गुरुवारी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त ब्राझीलमधील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. हा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही, यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.