श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील दोघा करोना संशयितांचे तपासणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून, दोघांनाही करोनाची बाधा झालेली नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत श्रीगोंद्यातील 18 करोना संशयितांची तपासणी करण्यात आली असून, त्यांचे सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत, ही समाधानाची बाब आहे.
या दोन संशयितांमध्ये शिक्रापूर येथील करोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कात आलेली महिला आणि पुणे येथून आजारपणामुळे श्रीगोंद्यात परतलेले पोलीस कर्मचारी, या दोघांचा समावेश आहे. या दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. यामध्ये संशयित महिलेचे माहेर श्रीगोंद्यात आहे.
महिला येथे आल्यानंतर तिची करोना टेस्ट करण्यासाठी घशाचा स्त्राव घेण्यात आला. तसेच पुण्यात पोलीस खात्यात कार्यरत असणारी तालुक्यातील व्यक्ती आजारपणामुळे परतली होती. तिच्याही घशाचा स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. या दोघांचे तपासणी अहवाल रविवारी (दि.19) सकाळी प्राप्त झाले. त्या अहवालानुसार या दोघांनाही करोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आजपर्यंत श्रीगोंद्यातील एकूण 18 संशयित व्यक्तींची करोना तपासणी क