वॉशिंग्टन- जेम्स बॉंडचे जगभरात असंख्य चाहते आहेत. बॉंडपटांच्या मालिकेतील चित्रपटांची त्यांना अत्यंत उत्कंठतेने प्रतिक्षा असते. या मालिकेतील नो टाइम टू डाय हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे बॉंडलाही आपला विचार बदलावा लागला. मात्र आता हा चित्रपट प्रदर्शसाठी सज्ज झाला आहे.
बॉंडच्या निर्मात्याने सोशल मीडियावर चित्रपटाचे नवे पोस्टर जारी केले असून त्यात जेम्स बॉंड त्याच्या शत्रुवर नेम धरताना दिसतो आहे. बॉंडपटांच्या मालिकेतील नो टाइम टू डाय हा 25 वा चित्रपट असून तो अगोदर ब्रिटनमध्ये 12 नोव्हेंबरला तर अमेरिकेत 20 नोव्हेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. त्यानंतर जगातल्या अन्य देशांत तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
जमैकात निवृत्तीचे आयुष्य जगत असलेल्या बॉंडच्या भेटीला सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेतील त्याचा एक मित्र भेटायला येतो व तो बॉंडची मदत मागतो. त्यानंतर बॉंड या मिशनवर जाण्याचे कबुल करतो असे साधारण या चित्रपटाचे कथानक आहे.
युरोप आणि एकुणच जगभरातील सुंदर शहरे, अलिशान घरे-बंगले- गाड्या, सुंदर महिला, जबरदस्त ऍक्शन, बुध्दीला चालना देणारे आणि खुर्चिला खिळयून ठेवणारे कथानक आणि रंजक आणि हुकुमती मांडणी यामुळे बॉंडपटांचा एक वेगळाच चाहतावर्ग जगभरात निर्माण झाला आहे.
त्याच्या नो टाइम टू डायकडून प्रेक्षकांना याच अपेक्षा आहेत.