Salman khan : बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) ‘गदर 2′ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा सनी देओल प्रसिद्धीच्या झोतात आला. गदर 2’ सिनेमानंतर तो आता आमिर खानच्या ‘लाहोर 1947’मध्ये दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने आमिर खानसोबत चित्रपट करण्याची घोषणा केली होती. याशिवाय सध्या सनी देओल ‘सफर’ चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे. यात सलमान खानची एंट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सनी देओलच्या आगामी ‘सफर’ चित्रपटात सलमान खान कॅमिओ करणार आहे. 12 आणि 13 जानेवारीला महबूब स्टुडिओत सलमान खान सनी देओलसोबत शूट करण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही. मात्र सलमान खान आणि सनी देओल एकत्र दिसणार चाहत्यांच्या देखील चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
यापूर्वी सलमानने शाहरुख खान, अजय देवगण, रितेश देशमुख आणि रणबीर कपूर यांच्या सिनेमात कॅमिओ केला होता. सलमान खानचा ‘टायगर 3’ नुकताच रिलीज झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करू शकला नाही. तर दुसरीकडे, सलमान खान लवकरच ‘द बुल’ सिनेमात दिसणार आहे. द बुल एक अॅक्शन साहसी चित्रपट आहे, ज्याची निर्मिती करण जोहर करत आहे.