मुंबई – अभिनेत्री आमिष पटेलला कोण ओळखत नाही. गदर आणि कहोना प्यार है सारखे हिट चित्रपट दिल्यामुळे आजही आमिष पटेलचा मोठा चाहता वर्ग आहे . वयाच्या ४६ व्य वर्षी देखील आमिष एकदम फिट आणि बोल्ड दिसते. म्हणूनच दिवसेंदिवस तिचे चाहते वाढत चालले आहेत. सध्या ती चित्रपटांपेक्षा आपल्या सोशल मीडियावरील कारनाम्यांमुळे जास्त चर्चेत असते.
आपल्या शूटिंग आणि इतर प्रोजेक्ट्समधून वेळ काढत आमिषाने सोशल मीडियावर नवीन फंडा सुरु केला आहे. ती आपल्या फॅन्ससोबत थेट व्हिडीओ कॉल करून संवाद साधते. विशेष म्हणजे संवाद साधतानाचे तिचे अनेक व्हिडीओ क्षणात व्हायरल होतोना दिसतात. लेट नाईट असो आमिष शूटसाठी बाहेर असो वा घरी फॅन्ससोबत संवाद साधताना ती कायमच फ्रेश मूडमध्ये दिसते.
View this post on Instagram
अनेक वेळा शेअर केलेत असे व्हडिओ
तारा सिंगच्या सकीनाने असे हॉट कपडे घालून व्हिडिओ कॉलमध्ये बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. व्हिडीओमध्ये अभिनेत्री अनेकदा असे हॉट कपडे परिधान करताना दिसली आहे. खुद्द अमिषानेही अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर केले आहेत. अमिषा पटेल लवकरच सनी देओलसोबत ‘गदर 2’ चित्रपटात दिसणार आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ कॉलद्वारे चाहत्यांशी संवास साधण्याची तिची स्टाईल फॅन्सला भलतीच आवड्ताना दिसत आहे. म्हणूनच अमिषाचे असे व्हिडीओ लगेच व्हयरल होतात. विशेष म्हणजे तिच्या बोल्ड अवतारामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स वाढतच चालले आहेत.