Bollywood : अभिनेत्री अमीषा पटेलचा ‘गदर 2’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर आता ती एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अमीषासोबत अभिनेता अरबाज खान दिसत आहे. क्लबमध्ये हो दोघं हातात हात घालून जात असल्याचे दिसत आहे. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हायरल व्हिडिओ अमीषा आणि अरबाज एकमेकांच्या हातात हात घालून थायलंडमध्ये एका क्लबच्या उद्धाटनासाठी पोहोचले होते. यावेळी अरबाजने ब्लॅक टी-शर्ट आणि ग्रे जॅकेट घातला होता. तर दुसरीकडे अमीषाने ब्लॅक मिनी ड्रेस परिधान केला होता. क्लबमध्ये हो दोघं हातात हात घालून आले, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच होत्या. या दोघांनी क्लबमध्ये डान्ससुद्धा केला. हा व्हिडिओ थायलंडमधील असल्याचे म्हंटले जात आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. ‘या दोघांची जोडी खरंच छान वाटते’, असं एकाने लिहिलं. तर ‘सुपर ॲमी आणि सुपर अरबाज’ असं दुसऱ्या युजरने म्हंटले आहे. या दोघांनी एकमेकांना डेट केले पाहिजे, असंही काही नेटकऱ्यांनी सुचवले आहे. त्यांचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
दरम्यान, अमीषा पटेलने हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून पदार्पण केले, जो ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. यानंतर ती गदरमध्ये आली आणि हा चित्रपटही सुपरहिट ठरला. या दोन्ही चित्रपटांमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मागील एका मुलाखतीत तिने संजय लीला भन्साळी यांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले होते. खरं तर, त्याचा अर्थ असा होता की अमीषाला ते स्टारडम मिळालं जे अनेक चित्रपट करूनही लोकांना मिळत नाही, मात्र या दोन चित्रपटांमधून ती सुपरस्टार झाली होती. त्यामुळे पुढे काम करण्याची काय गरज आहे? भन्साळींच्या या शब्दांचा अर्थ अमीषाला बऱ्याच वर्षांनी समजल्याचे तिने मुलाखतीत सांगितले होते.