मुंबई – ‘बरसात’ चित्रपटातून ‘बॉबी देओल’ ने नायक म्ह्णून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. बरसात नंतर गुप्त, सोल्जर, अजनबी असे अनेक सुपर हिट चित्रपट त्याने दिले. 24 वर्षांच्या करिअरमध्ये बॉबीने 41 चित्रपट केले आहेत. अशातच बॉबी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा चित्रपट नसून वेब सिरीज आहे.
Here is the first look of #Aashram, i am looking forward to seeing it together with you all on August 28, 2020 only on @MXPlayer.@prakashjha27 @IamRoySanyal @AaditiPohankar @DarshanKumaar @AdhyayanSsuman pic.twitter.com/FQGaN0GKea
— Bobby Deol (@thedeol) July 31, 2020
बॉबीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आश्रम या वेब सिरीजमधील त्याचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. त्यांनी या पोस्ट मध्ये लिहीले आहे की,’आश्रम चा फर्स्ट लुक हा आहे. 28 ऑगस्टला ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या वेब सिरीजची एमएक्स प्लेयर रिलीज होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आश्रममधील साधूच्या लुक ची युजर्स द्वारे चांगली दाद दिली जात आहे .