पुणे – आर्य क्रीडा मंडळ आणि चाकण ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने ” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” ( Amrit Jubilee Year of Savitribai Phule Pune University) भव्य रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचे शुभहस्ते आणि रसायनशास्त्र विभाग विभागप्रमुख डॉ. अविनाश कुंभार, इतिहास विभागाचे डॉ. बाबासाहेब दुधभाते यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.
सेवक चाळीतील सेवक, त्यांचे पाल्य आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले. शिबिरामध्ये अमृत महोत्सव निमित्त 76 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
रक्तदान शिबिर सोहळ्याचे सुत्रसंचालन बसवंत गजलवार, अतिथींची ओळख आणि स्वागत डॉ. उमेश कसबे, आभार प्रदर्शन योगेश काळभोर यांनी केले.
सर्व अतिथींना अध्यक्ष मनिष गायकवाड यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यात संतोष सुगावे, राहुल चांदेरे, रुपेश कदम, स्वानंद उत्तेकर, अजिंक्य काशिद, आर्यन सागरे, ओंकार बोत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.