पुणे (प्रतिनिधी) – नऱ्हे येथील तक्षशिला को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 50 जणांनी रक्तदान केले. सोशल डिस्टनिंगचे पालन करुन या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत तक्षशिला सोसायटीच्या वतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. केईएम रुग्णालयाच्या ब्लड बँकेने यासाठी चांगले नियोजन केले होते.