नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे.
उत्तर प्रदेशात सकाळी ८ वाजल्यापासून सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
Uttar Pradesh set for counting of votes from 8 am; Visuals from Varanasi#UttarPradeshElections2022 pic.twitter.com/K9jld5ljDs
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची जबरदस्त आघाडी दिसून येत आहे.१०० हून अधिक जागांवर पक्ष पुढेअसल्याचे दिसत आहे.