नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात तणाव कायम आहे आणि देशभरात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पश्चिम बंगाल पक्षाचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि पश्चिम बंगालचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घरातून धरणे आंदोलन सुरु केले.
तथापि, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन व्हिडिओच्या माध्यमातून केले जात आहे. या निदर्शनात भाजपाचे अनेक नेते सहभागी होत आहेत. विजयवर्गीय इंदूर येथून तर सुप्रियो हे दिल्लीत आंदोलन करत आहेत.
यापूर्वी, पश्चिम बंगालमधील कोविड -१९ चे मूल्यांकन करणाऱ्या पथकाने शनिवारी पश्चिम बंगाल सरकारवर सहकार्य केले नसल्याचा आरोप केला होता. तसेच पश्चिम बंगालच्या तृणमूल कॉंग्रेस सरकारने राज्यातील कोरोना विषाणूच्या संकटाचे गांभीर्य लपवल्याचा आणि आकडेवारीत फेरबदल केल्याचा आरोप करीत भाजपने शनिवारी केला होता.
Delhi: Union Minister Babul Supriyo, BJP MPs from West Bengal and other party leaders protest against West Bengal government and Chief Minister Mamata Banerjee, over #COVID19 pic.twitter.com/pZPvTYb2Uw
— ANI (@ANI) April 26, 2020