Pooja Dadu – मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील भाजप नेत्या पूजा दादू (Pooja Dadu) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. यानंतर पूजा दादू (Pooja Dadu) यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी पूजा यांना मृत घोषित केले.
पूजा दादू या नेपानगरचे माजी आमदार, कै. राजेंद्र दादू यांच्या कन्या होत्या. तर, पूजा दादू यांची मोठी बहीण मंजू दादू मंडी मंडळाच्या उपाध्यक्षा आहेत. पूजा दादू यांनी रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबीयांनी तातडीने पूजा यांना बुरहानपूरच्या संजय नगर येथील रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी पूजा दादू यांना तपासून मृत घोषित केले.
पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हे आत्महत्येचं प्रकरण दिसत असल्याचे वरिष्ठ अधिकारी देवेंद्र पाटीदार यांनी सांगितले.