पारनेर – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जागांसाठी 41 अर्ज शिल्लक राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी दिली. पारनेर तालुक्यात बाजार समितीच्या निवडणकी निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना अशी महाविकास आघाडीची अखेर युती झाली असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.
पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रामुख्याने सेवा संस्थेच्या 11 जागांसाठी 24 उमेदवार,ग्रामपंचायत मतदार संघातील 4 जागांसाठी 8, व्यापारी मतदारसंघातील 2 जागांसाठी 4, हमाल मापाडी मतदारसंघातील 1 जागेसाठी 5 अर्ज दाखल करण्यात आले आहे. आज 110 उमेदवारांनी माघार घेतली असून सेवा संस्था मतदारसंघातून 78, ग्रामपंचायत मतदारसंघातुन 23, व्यापारी मतदारसंघातून 5, तर हमाल मापाडी मतदारसंघातून 4 उमेदवारांनी माघार घेतली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्या झालेल्या जागावाटपात 18 जागांपैकी 13 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस तर शिवसेनाला 5 जागा देण्याबाबत चर्चेअंती निर्णय झाला. त्यामुळे आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्या निर्णयाने ही निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे सोसायटी सर्वसाधारण : रामदास भोसले, दिलीप मदगे, सुरेश पठारे, गंगाधर रोहोकले, अशोकराव सावंत, किसन सुपेकर, आबासाहेब खोडदे, प्रशांत गायकवाड, संतोष आंधळे, संदीप साळके, स्वप्नील मावळे, बाबासाहेब तरटे, अरुण ठाणगे, संतोष पठारे, प्रकाश ठाणगे, उत्तम पठारे.
महिला राखीवः सीताबाई महादु गायकवाड, संध्या कल्याण काळे, मेधा श्रीरंग रोकडे, पद्मजा श्रीकांत पठारे. इतर मागास वर्गः गंगाराम बेलकर, रामदास सावळे, राम रसाळ. विमुक्त जाती-भटक्या जमातीः स्वप्नील राहिंज, बाबासाहेब नऱ्हे. ग्रामपंचायत सर्वसाधारणः लहू भालेकर, शिवाजी खिलारी, विजय पवार, किसनराव रासकर. आर्थिक दृष्टया दुर्बलः भाऊसाहेब शिर्के, पंकज कारखिले. हमाल मापाडीः नवनाथ बुगे, तुकाराम चव्हाण, संजय मते, ठकाराम खोडदे, संदीप कावरे. व्यापारी आडतेः अशोकलाल कटारिया, अशोक चेडे, दत्तू पुजारी, चंदन भळगट.
बेलकर राष्ट्रवादीकडून तर भालेकर भाजपकडून
वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर यांचे राजकीय गुरु म्हणून पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बेलकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. परंतु गंगाराम बेलकर यांचे शिष्य लहु भालेकर यांनी मात्र बाजार समिती निवडणुकीसाठी सेवा संस्था मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चेला भाजपमध्ये तर गुरु राष्ट्रवादीत अशी चर्चा तालुक्यात रंगु लागली आहे.