बारामती- जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी (दि. 2) बारामती येथे तहसील कार्यालयामोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे व शहराध्यक्ष सतीश फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.