दोहा, काबूल : तालिबानने दोहा कराराचे पालन केल्यास येत्या 14 महिन्यात अमेरिका आपले सैन्य अफगाणीस्तानमधून पूर्णत: मागे घेईल अशी घोषणा अमेरिका आणि अफगाणीस्तान सरकारने संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे.
सुरवातीच्या 135 दिवसांत 8600 जवान मायदेशी नेण्यात येतील. उर्वरीत सैन्य अफगाणीस्तानातून 14 महिन्यात मागे घेण्यात येईल. सर्व ताळांवरील सर्व सैन्य मागे घेण्यात येईल, असे या करारत स्पष्ट करण्यात आले आहे. दोहा येथे करार करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र राज्यमंत्री माईक पोम्पिओ शनिवारी दोहा येथे दाखल झाले. भारताचे दोहामधील राजदूतही या ऐतिहासिक सोहोळ्यासाठी उपस्थित होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर तालिबान आणि अफगाणीस्तान सरकार या कराशी एकनिष्ठ राहिले तर आमच्यासाठी अफगाणीस्तानातील युध्द थांबवण्याचा मार्ग प्रशस्त होईल. आणि आम्ही आमचे सैन्यत माघारी नेऊ. अमेरिका आणि तालिबान यांच्या थेट चर्चेतून संरक्षण मंत्री मार्क इस्पर आणि अफगाणीस्तान सरकार यांच्यात संयुक्त निवेदन जारी करण्यात येईल.