वडगाव मावळ, (वारत्हर) – आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात विजय मिळविणार याची सर्वांनाच खात्री आहे. त्या अनुषंगाने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.२७) मावळ लोकसभा मतदारसंघ कोअर कमिटीची बैठक रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पार पडली.
बैठकीला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, देश सचिव विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, माजी आमदार सुरेश लाड, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे,
प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री मकरंद देशपांडे, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे आदी उपस्थित होते.