पुणे – भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्याप्रकरणी एकास सोमवारी अटक करण्यात आली. याप्रकरणात शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी गवते (वय ३२, रा. नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा शोध सुरू होता. गवते याला सोमवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.