BJP Candidates List । भाजपने आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 12वी यादी जाहीर केली. या यादीत चार राज्यांतील सात जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या चार राज्यातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. भाजपने आपल्या नवीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंजाबसाठी सर्वाधिक तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
BJP releases its 12th list of candidates for the Lok Sabha elections.
#LokSabaElection2024 pic.twitter.com/DihIkG6caV
— ANI (@ANI) April 16, 2024
महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी BJP Candidates List ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १३व्या पिढीतील छत्रपती उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. साताऱ्यातून भाजपचे उमेदवार केलेले उदयनराजे भोसले हे प्रदीर्घ काळापासून परिसराच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते सध्या राज्यसभेचे सदस्यही आहेत.
महाराष्ट्रातील केवळ एका जागेसाठी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून अभिजित दास यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांचा सामना टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्याशी होणार आहे.
पंजाबमध्ये कोणाला दिले तिकीट? BJP Candidates List ।
पंजाबमधील ज्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत त्यात खदूर साहिब, होशियारपूर (अनुसूचित जाती) आणि भटिंडा यांचा समावेश आहे. भाजपने खादूर साहिबमधून मनजीत सिंग मन्ना मियाविंद, होशियारपूरमधून अनिता सोम प्रकाश आणि भटिंडामधून परमपाल कौर सिद्धू यांना उमेदवारी दिली आहे. माजी आयएएस अधिकारी परमपाल कौर सिद्धू यांनी गेल्या आठवड्यातच भाजपमध्ये प्रवेश केला होता. तिला पंजाब स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.