मुंबई – ‘बिग बॉस 14’ फेम रुबिना दिलैक अलीकडे तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रुबिनाने रंगीत फ्लोरल स्प्लिट ड्रेस घातलेले तिचे काही फोटो पोस्ट केले होते. फोटोमध्ये रुबिना सुंदर दिसत आहे आणि जेव्हा तिचा पती अभिनव शुक्लाने पोस्ट पाहताक्षणी रिएक्शन दिली. अनेक चाहते आता या फोटोवरून अंदाज लावत आहे की, लवकरच यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे. रुबिन प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. आता रुबिनाचा पती अभिनव याने यावर प्रतिक्रिया दिली असून सत्य सांगितले आहे.
अभिनव शुक्ला यांनी रुबिना दिलैकच्या गरोदरपणाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली की,’मी प्रवास करत असताना याबद्दल फारसे वाचले नाही. या फक्त अफवा आहेत. मी त्यावेळी प्रवास करत होतो, त्यामुळे त्याबद्दल फार काही वाचलं नाही. मला माहित नाही काय झाले आणि लोक त्याबद्दल का बोलू लागले. त्याने एक फोटो टाकला आणि लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या. मला याबाबत काहीही म्हणायचे नाही. लोकांना चर्चा करू द्या. दरम्यान सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
रुबिना दिलीकने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अफवा सुरू झाल्या. व्हिडिओमध्ये रुबिनाने दोन वेगवेगळे कपडे घातले आहेत. तिने सुरुवातीला ब्लॅक फ्लोय ड्रेस घातला आहे, नंतर ती स्ट्रॅपी पॅटर्नच्या ड्रेसमध्ये स्विच करते. रुबिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बेबी बंप दिसत असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आल्यावर ही अटकळ सुरू झाली.