मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर राज्याचे राजकीय वर्तुळासह देशातील राजकारणात देखील हा विषय चर्चेचा झाला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करायला सुरुवात केली.कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करायला सुरुवात केली. यानंतर आता राष्ट्रवादीच्या निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळल्याने वृत्त समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्य्क्ष पदावरून शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पक्षाला नवा अध्यक्ष कोण असेल यावरून चर्चा सुरु असताना आता शरद पवारांनीच अध्यक्ष राहावं असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आल्याचे समजते. समितीने शरद पवारांनी राजीनामा फेटाळला आहे.
काय म्हणाले होते पवार निवृत्ती घेताना
“कुठे थांबायच हे मला कळते. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, गेली सहा दशके राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,असे शरद पवार यांनी म्हटले.त्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण असेल याबाबतचा निर्णय समितीने घ्यावा असं देखील पवार यावेळी म्हणाले होते.
मात्र आता या समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळल्याने समजते. पवारांनीच अध्यक्ष राहावे असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जमून पवारांच्या समर्थनार्थ जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.