नवी दिल्ली – मनी लॉंड्रिंग प्रकरणी तामिळनाडूमधील 207 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीकडून रविवारी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुंतवणुकदारांनी निओमॅक्स प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध नोंदवलेल्या तक्रारींनंतर तामिळनाडू पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एफआयआरवरून ईडीचा तपास सुरू आहे.
या समूह कंपन्यांनी 12-30 टक्के व्याजासह उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन विविध प्रकल्पांमध्ये (प्लॉट डेव्हलपमेंट) लाखो पैसे जमा करून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली, असे ईडीने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
गुंतवणुकदारांनी निओमॅक्स प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड विरोधात दाखल केलेल्या तक्रारींनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लिमिटेड आणि तिच्या समूह कंपन्यांना 12 ते 20 टक्के व्याजासह जास्त परतावा देण्याचे वचन दिले होते. तसेच अनेक प्रकल्पांमध्ये लाखोंची रक्कम जमा करण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. कंपनी आणि तिचे प्रवर्तक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आहे.