वाघोली – केसनंद लोणीकंद रस्त्यावर भारत गॅस टँकर पलटी झाला असून लोणीकंद सतर्कतेमुळे कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिली आहे.
लोणीकंद येथील मगर वस्ती रात्रौ २ वा. चे सुमारास मगर वस्ती लोणीकंद येथे भारत गॅस टँकर पलटी झाला व त्यातून अत्यंत कमी प्रमाणात गॅस गळती होत आहे. सदर रोडवरील वाहतूक दुसऱ्या ठिकाणी वळविण्यात आली आहे. त्यासाठी दहा चेक पॉईंट्स / पंक्चर पॉईंट्स वर अंमलदार पोलीस नेमले आहेत. रात्रीच अग्निशमन दल व भारत गॅस चे safety manager यांना घटनास्थळी बोलावले आहे. घटनास्थळावरून high tension विद्युतवाहक तारा जात असल्याने MSEB संपर्क करून विद्युत प्रवाह बंद केला आहे. सदर भागात घरे असणाऱ्या लोकांना आवश्यक त्या safety precautions दिलेल्या आहे.
गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये भरणे सुरू झाले आहे. आॅपरेशन अजून ४-५ तास चालणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी केले आहे.